कोर्टानं आयोगाला #EVM #VVPAT संदर्भात हे मुद्दे स्पष्ट करण्यास सांगितले
EVM आणि VVPAT प्रकरणी आज 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावनी होणार आहे, सुनावणीचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला होता त्यामुळे आज निकाल नेमका काय असेल हे बघण उत्सुकतेचं ठरणार आहे.
EVM आणि VVPAT संदर्भात खालील मुद्दे स्पष्ट करण्यास सांगितले आहेत -
1. सुप्रीम कोर्टाने EVM आणि VVPAT कंट्रोलर संबंधित तांत्रिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले.
2. कोर्टाने विचारले की मायक्रोकंट्रोलर कंट्रोलिंग युनिटमध्ये बसवलेला आहे की VVPAT मध्ये ?
3. प्रोग्राम मायक्रोकंट्रोलरमध्ये फक्त एकदाच फीड केला जाऊ शकतो का?
4. कमिशनकडे किती सिंम्बॅाल लोडिंग युनिट्स किती उपलब्ध आहेत?
5. निवडणूक याचिका दाखल करण्याची अंतिम मुदत निवडणूक संपल्यानंतर 30 दिवस आहे की 45 दिवस ?
6. कंट्रोल युनिटसह VVPAT मशीन सीलबंद आहे का?