.....पुन्हा तर मास्क सक्ती करावी लागेल - राजेश टोपे यांचा इशारा

Update: 2022-05-01 06:52 GMT

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात आज कोरोना रुग्ण संख्या कमी असून महाराष्ट्र सध्याच्या कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत 8 व्या क्रमांकावर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा हा परीणाम आहे. सर्व वयोगटातील नागरीकांना लसीकरण करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाऊन आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील मात्र मास्क नागरीकांनी वापरावा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं

भविष्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास मास्क सक्ती करावी लागेल असा ईशारा देखील टोपे यांनी केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त टोपे यांच्या हस्ते जालन्यात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचं का यावरही चर्चा झाली. सध्या लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचं आवाहन केलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं लागू करु शकतो.

Tags:    

Similar News