जगातील पहिले जल विद्यापीठ भारतात बांधले जाणार,जल शास्त्रज्ञांनी 25 एकर जमीन दान केली
बुंदेलखंड, यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यात देशातील पहिले जल विद्यापीठ बनवले जाणार आहे. हमीरपूर जिल्ह्यातील 25 एकर जागेवर हे जगातील पहिले जलविद्यापीठ उभारले जाणार असून, त्यामध्ये जलसंधारणाचे धडे देशासह जगभरातील विद्यार्थी लवकरच शिकणार आहेत.;
Hamirpur Water University: बुंदेलखंड, यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यात देशातील पहिले जल विद्यापीठ बनवले जाणार आहे. हमीरपूर जिल्ह्यातील 25 एकर जागेवर हे जगातील पहिले जलविद्यापीठ उभारले जाणार असून, त्यामध्ये जलसंधारणाचे धडे देशासह जगभरातील विद्यार्थी लवकरच शिकणार आहेत. हे पहिले असे विद्यापीठ असेल, जिथे विद्यार्थी आणि संशोधकांना प्राचीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पाणीटंचाईमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर संशोधन केले जाणार आहे. या विद्यापीठात यूजीसीच्या मानकांनुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत, ज्यामध्ये जलसंधारण आणि जलसंकट हे मुख्य अभ्यासक्रम म्हणून शिकवले जातील.
प्रो. रविकांत पाठक आणि जलयोद्धा उमाशंकर पांडे यांचा पुढाकार.
या अनोख्या जलविद्यापीठाची सुरुवात स्वीडनमधील हमीरपूर जिल्ह्याचे रहिवासी आणि पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा. रविकांत पाठक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित जलयोद्धा उमाशंकर पांडे यांनी केली आहे. भविष्यात उद्भवणारी पाण्याची समस्या लक्षात घेत माजी जिल्हादंडाधिकारी डॉ.चंद्रभूषण यांनी हा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे पाठविला होता. प्रा. रविकांत पाठक यांनी या जलविद्यापीठासाठी 25 एकर जमीन दान केली आहे. जिल्ह्यातील रिरुई पारा गावचे रहिवासी असलेले गोवेनवर्ग (स्वीडन) विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे शास्त्रज्ञ प्रा. आर.के.पाठक म्हणाले की, जलसंधारणाचे धडे घेण्यासाठी लवकरच देशभरातील आणि जगभरातील लोकं जल विद्यापीठात येतील.
जलविद्यापीठासाठी २५ एकर जमीन केली दान
स्वीडनहून भारतात परतलेल्या डॉ.रविकांत पाठक यांनी आपल्या गावात आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे गुण शिकवताना अनेक फळबागा आणि सुधारित जातीच्या पिकांचे उत्पादन सुरू केले आहे, मात्र परिसरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या जलसंकटामुळे इथे असलेल्या शेतजमिनीतून उत्पन घेणे, इथल्या जमिनीवर शेती करणं मर्यादीत झालं आहे. यामुळे त्यांनी २५ एकर जमीन दान करून जलविद्यापीठ सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हवामान तज्ञ प्रा. पाठक यांनी या जलविद्यापीठात शिक्षण विद्या शाखा चालवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचा प्रस्ताव तयार असून, त्यात पाच अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. यामध्ये जलविज्ञान, जल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, जल आणि मानवता आणि जल आणि अवकाश हे प्रमुख क्षेत्र असतील.
भविष्यात ओढावणार संकट‘अर्ध्या जगात पाण्यासाठी लढाई होईल’
जलयोद्धा आणि पद्मश्री उमाशंकर पांडे म्हणाले की, 'पाणी संकट हळूहळू केवळ बुंदेलखंडमध्येच नव्हे तर संपूर्ण जगाची मोठी समस्या बनणार आहे. निम्म्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार नाही, त्यामुळे जलसंधारण शिकणे आणि जलसंकटामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. यामुळे यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यात जगातील पहिले जल विद्यापीठ स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सरकारकडून परवानगी मिळताच हे विद्यापीठ सुरू होईल. शतकानुशतके दुष्काळाने होरपळत असलेल्या बुंदेलखंडमधील हमीरपूर जिल्ह्यात पहिले जलविद्यापीठ सुरू झाल्याने देशातील व जगातील विद्यार्थ्यांसह येथील जनतेला जल व्यवस्थापनाविषयी जाणून घेण्याची व अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.