Gujrat Election 2022 : गुजरात निवडणूकीसाठी तारखा जाहीर, दोन टप्प्यात होणार मतदान

डिसेंबर 2022 मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.

Update: 2022-11-03 08:04 GMT

हिमाचल प्रदेश (Himachal pradesh) आणि गुजरात विधानसभा (gujrat election date) निवडणूक एकाच वेळी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही निवडणूकांच्या तारखा वेगवेगळ्या दिवशी जाहीर केल्या.

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार (rajiv kumar) यांनी आज गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा पत्रकार परिषदेत जाहीर केल्या.

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात (gujrat election in two stage) होणार असून पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

त्याबरोबरच दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी केली जाणार आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे 14 आणि 17 नोव्हेंबर असणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील अर्जाची छाननी 15 तर दुसऱ्या टप्प्यातील अर्जाची छाणनी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

यानंतर 1 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तसेच 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यानंतर 8 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेश निवडणूकीसोबतच मतमोजणी पुर्ण होणार आहे.

मतदारांची संख्या (Voters)

गुजरात निवडणूकीसाठी 3.25 लाख लोक पहिल्यांदा मतदान करणार आहेत. तसेच एकूण मतदारांची संख्या 4.9 कोटी इतकी असणार आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे सर्व मतदान केंद्र ग्राऊंड फ्लोअरवर असणार आहेत. याबरोबरच 1 हजार 274 मतदान केंद्रावर फक्त महिला अधिकारी तैनात असणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

या निवडणूकीमध्ये दिव्यांगांसाठी 182 मतदान केंद्र असणार आहेत. त्याबरोबरच 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना घरीच मतगदानाची सुविधा पुरविण्यात येणार आहे.

गुजरातमध्ये 51 हजार 782 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. याबरोबरच 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर मतदान केंद्र असणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

या निवडणूकीत कुठेही गैरप्रकार होत असल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार दाखल करावी, असं आवाहन राजीव कुमार यांनी केलं.

Full View

Tags:    

Similar News