वाढत्या नागरी व्यवस्थेला पाण्याची कमतरता भासत आहे- जयंत पाटील

Update: 2021-10-24 13:20 GMT

वाढत्या नागरी व्यवस्थेला पाण्याची कमतरता भासत आहे, जलसंपदा विभागाकडून बांधण्यात आलेली धरणं कमी पडू लागली आहे त्यामुळे येत्या काळात शेतीसाठी लागणारे पाणी आणि नागरिकांना वापरण्यासाठी लागणारे पाणी याबाबत योग्य नियोजन केले जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातल्या जलसंपदा विभागाच्या कामांचा लवकरच आढावा घेण्यात येईल असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते ठाणे येथे पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रथम प्राधान्य महाविकास आघाडी म्हणून लढायला हवे, मात्र त्यासाठी स्थानिक गणितं जुळायला हवी. अशी भावना त्यांनी व्यक्त केली

आर्यन खान प्रकरणातील २५ कोटी खंडणी प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की , अंमली पदार्थ 'त्या' पार्टीत होते का?, की कोणी ठेवले याचा तपास व्हावा, केंद्र सरकार व भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे,पैसे उकळण्याचे काम करत आहे असा घणाघात त्यांनी केला. 

कोरोना प्रतिबंधक लस राज्य सरकारकडून पुरवली जाते. आव्हाडांनी लस घेण्यासाठी कळव्यात आवाहन केले होते, मात्र काही समाजकंटकाने बॅनर फाडले असं त्यांक सांगितले. आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळावर फार बोलणार नाही, त्याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे अधिक माहिती देऊ शकतील असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं.

Tags:    

Similar News