Mahatma Gandhi : महात्मा गांधींना देशभरातून आदरांजली
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने महात्मा गांधींना दिग्गजांनी आदरांजली वाहिली.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त देशभरातून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीचे आदर्श मुल्ये जागतिक पातळीवर पोहचवण्याचा सामुहिक प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटले की, बापुंचे आदर्श विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा आमचा सामुहिक प्रयत्न आहे. तसेच बापूंच्या स्मृतीदिनानिमीत्त देशासाठी धैर्याने लढणाऱ्या सर्व वीरांना अभिवादन.
Remembering Bapu on his Punya Tithi. It is our collective endeavour to further popularise his noble ideals.
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2022
Today, on Martyrs' Day, paying homage to all the greats who courageously safeguarded our nation. Their service and bravery will always be remembered.
महात्मा गांधींच्या स्मतृतीदिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करत महात्मा गांधींना अभिवादन केले. तर यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एक हिंदुत्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती. मात्र सगळ्या हिंदुत्ववाद्यांना वाटते की गांधी राहिले नाहीत. मात्र जिथे सत्य आहे तिथे बापु जीवंत आहेत.
एक हिंदुत्ववादी ने गाँधी जी को गोली मारी थी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 30, 2022
सब हिंदुत्ववादियों को लगता है कि गाँधी जी नहीं रहे।
जहाँ सत्य है, वहाँ आज भी बापू ज़िंदा हैं!#GandhiForever pic.twitter.com/nROySYZ6jU
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन करताना म्हटले आहे की, महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या मूल्यांद्वारे स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग प्रकाशमान केला. स्वराज्य, स्वदेशी, सर्वोदय ही तत्त्वे अंगिकारून देशाला परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन, असे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन केले.
महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या मूल्यांद्वारे स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग प्रकाशमान केला. स्वराज्य, स्वदेशी, सर्वोदय ही तत्त्वे अंगिकारून देशाला परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! #MahatmaGandhi pic.twitter.com/AQ1h1kOVUm
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 30, 2022
महात्मा गांधी ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे विचार अमर आहेत. त्यांना विनम्र अभिवादन, अशा शब्दात अजित पवार यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनी अभिवादन केले.
This Martyr's day, paying tribute to Mahatma Gandhiji on his death anniversary & paying homage to the soldiers who lost their lives while preserving the Country's sovereignty.#MahatmaGandhi #MartyrsDay pic.twitter.com/0i0v3LZWMB
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 30, 2022
यांच्यासह देशभरातून महात्मा गांधी यांना अभिवादन केले जात आहे.