BMC च्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे राज्यपालांनी दिले आदेश

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई महापालिकेच्या खांद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलेत.

Update: 2022-01-02 03:33 GMT

मुंबई// विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यातच आता राज्यपाल कोश्यारींनी मुंबई महापालिकेच्या खांद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलेत. BMC च्या आश्रय योजनेतमध्ये 1 हजार 844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे. याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. या योजना अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत. या आश्रय योजनेत आतापर्यंत 1 हजार 844 कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झालेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. याबाबत भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.

Tags:    

Similar News