"शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श;" राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केली. तसेच भगतसिंह कोश्यारी "शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श" असे वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील काही संघटना आक्रमक होताना दिसत आहेत.;

Update: 2022-11-19 11:42 GMT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही महिन्यांपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्यावरती वादग्रस्त भाष्य करुन, महाराष्ट्रात वाद निर्माण केला होता. यापूर्वीही कोश्यारी यांची वक्तव्य नेहमी चर्चेत राहिलेत. मराठावाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांना भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी.लीट पदवी देताना, कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. " शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श आहेत मी नव्या योगाविषय वोलतोय" असे विधान कोश्यारी यांनी केले आहे. कोश्यारी यांनी नव्या युगाचे उदारहण देताना छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केली त्यामुळे महाराष्ट्रात संभाजी बिग्रेड संघटना आक्रमक झाली. संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते शिवानंद भानुसे म्हणाले की, "शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही आणि कशाशीही होऊ शकत नाही. भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्रात अशी यापूर्वी खुप विधाने केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जागतीक स्तरावरचे नेते होते."

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना काय संबोधीत केले-

"आम्ही लहान असताना आमचे शिक्षक विचारायचे की तुमचे आदर्श नेते कोण आहेत? काही विद्यार्थ्यांना सुभाषचंद्र भोस आवडायचे, कुणाला गांधीजी आवडायचे, काही विद्यार्थी नेहरु यांचे नाव सांगायचे. जर तुम्हाला कोणी विचारले की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर जास्त विचार करण्याची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपासून तुम्हाला इथेच मिळतील." असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

Tags:    

Similar News