मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी,गेट वे ते बेलापूरदरम्यान ‘ई-वॉटर टॅक्सी’

Update: 2023-11-26 07:48 GMT

मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्नांवर मात देण्यासाठी मुंबई सागरी मंडळाने गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान ‘ई-वॉटर टॅक्सी’ (E-Water Taxi) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात चार बोटींचा समावेश असून यातील दोन बोट डिसेंबर(December) महिन्यापासून सेवेत दाखल होणार आहे.या प्रवासासाठी १०० ते १५० रूपये आकारले जातील.ही सेवा सुरू झाल्यास गेट वे ते बेलापूर हे अंतर फक्त एका तासात कापता येईल.

एका खासगी कंपनीच्या माध्यमातून दीड-दोन वर्षांपूर्वी गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रतिसादाअभावी ती बंद पडली होती.असे असुन सुद्धा आता गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर आणि गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा अशी विद्युत अर्थात इलेक्ट्रिक ‘ई-वॉटर टॅक्सी’
 सुरू करण्यात येणार आहे.ही वॉटर टॅक्सी इतर बोटीच्या तुलनेत अधिक वेगवान आहे.या ई-वॉटर टॅक्सीमुळे प्रदुषणालाही आळा बसेल.



Tags:    

Similar News