दिवाळी पूर्वीच सोने चांदी भावात उसळी...

आजचे सोने दर : सोने प्रतितोळा 80,250 रुपये तर चांदी प्रति किलो 1 लाखांवर भाव GST सह आहेत.

Update: 2024-10-19 11:25 GMT

आजचे सोने दर : सोने प्रतितोळा 80,250 रुपये तर चांदी प्रति किलो 1 लाखांवर भाव GST सह आहेत.

सोने-चांदी भावात गेल्या आठवडाभरापासून चढ-उतार सुरू आहेत. अवघ्या तीन दिवसात सोने प्रतितोळा 1700 रुपयांनी वाढले आहेत काल ते आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चांकी प्रती तोळा 80,250 रुपये GST सह उच्चांकी भावापर्यंत पोहचले आहेत.

चांदीच्या भावानेही उसळी घेत प्रति किलो एक लाखापर्यंत पोहचला आहॆ

दिवाळीतही आणखी वाढ होण्याची शक्यता जास्त सोने व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहॆ. जगात काही भागात युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज तज्ञांना होताच. मात्र, दिवाळीत सोने ८० हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता होती. दिवाळीच्या आठवडाभर अगोदरच सोन्याने हा टप्पा गाठला. येत्या दिवाळीत ईस्त्राईल-हमास यांच्यातील युद्धाचा भडका आणखी उडाल्यास दिवाळीत सोने आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News