सतेज पाटील यांनी कशी फोडली गोकुळची हंडी

Update: 2021-05-06 14:11 GMT

गोकुळ दूध संघाच्या सत्तेची हंडी सतेज पाटील यांनी फोडली आणि महाडिक यांच्याकडून सत्तेचे लोणी हिसकावण्यात यश मिळवलं. मात्र, तब्बल तीन दशके अबाधित असलेल्या महाडिकांचे वर्चस्व असलेल्या गडाला सतेच पाटील यांनी कसा सुरुंग लावला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी त्यांना ताकत देत विजयश्री खेचून आणला आहे. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने १७ जागांवर विजय मिळवला आहे. विरोधकांना केवळ चार जागा जिंकता आल्या आहेत.

२१०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा संचालक होणे. हे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी प्रतिष्ठा मानली जाते. गोकुळचा संचालक झाला की अल्पावधीत ऐश्वर्य प्राप्त होत असते. त्यामुळे आमदार खासदार चे पद नको. परंतु गोकुळचा संचालक करा अशी कार्यकर्त्यांची मागणी त्यांच्या पक्षाकडे असते.

राजू शेट्टी यांनी संचालक व्हायचं असेल तर 10 लिटर दूध न दमता काढून दाखवा असे आवाहन केले होते. या विधानामागुन ही लढाई शेतकऱ्यांसाठी नव्हे तर आपल्या वाट्याला मलाई खेचण्याची आहे असा चिमटा त्यांनी काढला होता.

Tags:    

Similar News