शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनेला माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नाव देणार

सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे काल रात्री सोलापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आज भाई गणपतराव देशमुख अनंतात विलीन झाले.;

Update: 2021-07-31 11:45 GMT

पंढरपूर : सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे काल रात्री सोलापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आज भाई गणपतराव देशमुख अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर आज सांगोला महिला सूतगिरणीच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी सोलापूर येथून त्यांचे पार्थिव मोहोळ तालुक्यातील पेनूर या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्यानंतर सांगोला तालुक्यातील गावागावात नागरिकांना आबासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले.

सांगोला बाजार समितीपासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली. त्यांच्या निवासस्थानी काही काळ पार्थिव ठेवण्यात आले. घरी विधी झाल्यानंतर पुन्हा सजवलेल्या रथामध्ये सांगोला सूतगिरणीकडे अंत्ययात्रा निघाली. यावेळी जवळपास 25 हजार लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. 'अमर रहे अमर रहे आबासाहेब अमर रहे' च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. यावेळी अनेकांच्या अश्रुंचे बांध फुटले. महिलांना तर अश्रू अनावर झाले.

सांगोला महिला सूतगिरणी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. शासनाच्यावतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. गणपतराव देशमुख यांचे मोठे चिरंजीव पोपटराव देशमुख आणि चंद्रकांत देशमुख यांनी पार्थिवाला मंत्रा अग्नी दिला.

राज्यसरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनेला भाई गणपतराव देशमुख यांचे नाव द्यावे अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील , माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना बोलून तशी योजना तयार करून भाईचे नाव देण्याची घोषणा केली.

यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी खासदार राजू शेट्टी, जेष्ठ नेते आण्णा डांगे , माजी मंत्री महादेव जानकर , माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे , आमदार जयंत पाटील , आमदार समाधान आवताडे , आमदार प्रशांत परिचारक , आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे , धैर्यशील मोहिते पाटील , माजी आमदार राजन पाटील आदी उपस्थित होते.

Tags:    

Similar News