माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला उमेदवार अर्ज मागे...! बीड विधानसभेच्या संदर्भाने मोठी बातमी हाती येत आहे. बीड विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होतील.