पंतप्रधान नरेंद्र मोदींना "मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” जाहीर, साताऱ्यात शिवजयंतीदिनी होणार वितरण

Update: 2024-01-31 23:12 GMT

साताऱ्याचे राजघराणे आणि शिवभक्तांच्यावतीनं यंदापासून 'शिवसन्मान पुरस्कार' देण्यात येणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार असनारआहे, हा पूरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. शिवजयंतीदिनी (दि. १९ फेब्रुवारी) समारंभ पूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.



 खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत. साताऱ्याच्या राजगादीला मोठा मान आहे. साताऱ्याचे राजघराणे आणि तमाम शिवभक्तांच्यावतीनं यंदापासून 'शिवसन्मान पुरस्कार' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावरील समारंभात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

याची माहिती राज्याचे उप मुख्यामंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी क्स (ट्विटर) या सोशल मिडीया मध्यामावर पंतप्रधान मोदिंचा शिवरायांच्या पुतळ्याचं दर्षण घेतानाचा फोटो पोस्ट करत दिली आहे.

यापूर्वीही त्यांना देश-विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील टिळक पुरस्कारही पंतप्रधानांना मागील वर्षी देण्यात आला होता.




Tags:    

Similar News