बीडमध्ये सिगारेटचे पैसे मागितल्याने केला गोळीबार

बीडच्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. हॉटेल यशराजमध्ये हॉटेलच्या मॅनेजरने सिगारेटच्या पाकीटचे पैसे मागितल्याच्या रागातून चार अज्ञातांनी गोळीबार केला.;

Update: 2023-08-11 06:51 GMT

काय आहे नेमका प्रकार?

हॉटेल यशराजमध्ये काल रात्री ४ अज्ञात ग्राहक आले होते. यांनी हॉटेलमध्ये काही वेळ घालवला. येथून निघताना हॉटेलच्या मॅनेजरसोबत त्यांनी सिगारेटच्या पैशावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हॉटेलातील साहित्यांची तोडफोड देखील केली. मॅनेजरने विरोध केला असता. चौघांपैकी एकाने हवेत बंदुकीच्या ३ गोळ्या झाडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने चौघा अज्ञातांनी तिथून पळ काढला. या घटनेप्रकरणी आज हॉटेल मालकाने फिर्यादी दिल्यावर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News