सेवालय चे रवी बापटाले यांच्या अडचणीत वाढ, 21 महिन्यानंतर अखेर गुन्हा दाखल
HIV बाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या रवी बापटले यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.;
लातूर(Latur) जिल्ह्यातील औसा(Ausa) तालुक्यातील हासेगाव(Hasegaon) येथे सेवालय संस्थेच्या माध्यमातून एड्सग्रस्त(AIDS) मुलांचे संगोपन करणाऱ्या रवी बापटले(Ravi Bapatle) यांच्यावर २१ महिन्यांनंतर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी भीमाशंकर बागवे (Bhimashankar Bagave )यांना विविध प्रकारे त्रास तसेच प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपातून औसा पोलिस ठाण्यात रवी बापटले यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवालयातील मुलांना प्रोत्साहित करून रवी बापटले यांनी प्रत्यक्ष हल्ला केल्याचा आरोप भीमाशंकर बागवे यांनी केला होता. त्यात कत्ती आणि इतर प्राणघातक शस्रांचा वापर केल्याची तक्रार भीमाशंकर बागवे यांनी केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. परंतू फिर्यादी भीमाशंकर बागवे यांनी औसा न्यायालयात (Ausa Court) दाद मागितली. त्यानंतर सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे औसा न्यायालयाने रवी बापटले यांच्यासह 8 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पलिसांनी रवी बापटले यांच्यासह आठ जणांवर औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतर सांगितले.
रवी बापटले हे नक्की कोण आहेत?
महाराष्ट्रातील विविध भागातील एड्सबाधित आधारहीन मुलांचा ते सांभाळ करतात. २००६ पासून ते हे काम करत आहेत. त्यांच्या या कामामुळे काही दानशूर लोकांनी हासेगाव परिसरात त्यांना शेतजमीन दान केली. यातूनच त्यांनी हासेगाव येथे सेवालय नावाचे आश्रम सुरु केले आहे. सध्या रवी बापटले पूर्णवेळ एड्सबाधित लोकांसाठी काम करत आहेत.
जमिनीचा वाद -
रवी बापटलेंच सेवालय हे आश्रम आणि भीमाशंकर बागवे यांची शिक्षण संस्था तसेच जमीन बाजूला असल्याकारणाने दोघांमध्ये २००७-०८ पासून वाद आहेत . या वादांमुळे दोघांमधील प्रकरण अनेक वेळा पोलिसांमध्ये देखील गेले आहे . २१ महिन्यापूर्वी झालेल्या वादातून भीमाशंकर बागवे यांनी रवी बापटले यांच्या विरोधात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता प्रकरण आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भीमाशंकर बागवे यांनी औसा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर रवी बापटले आणि अन्य ८ रवी बापटलेंच्या साथीदारांवर आदेशाने भादवी 307 , 395 , 327, 397 , 147, 148, 149, 506 आणि 34 नुसार औसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
-