बँकांच्या खासगीकरणाला स्थगिती नाही, अर्थमंत्री निर्मला सितारामन त्याचं वक्तव्य
देशातील सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले.
देशातील दोन राष्ट्रीय बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021 मध्ये केली होती. त्याला अनेक बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर बँकांच्या खासगीकरणाचा विषय मागे पडला. मात्र आता पुन्हा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बँकांचे खासगीकरण स्थगित होणार नाही.
ज्या पद्धतीने बँकांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया सुरूच राहील आणि बँकांचे खासगीकरण करण्यात येईल, असं मत निर्मला सितारामन यांनी व्यक्त केले.