मराठवाड्यातील शेतकरी उर्वरित नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमूळे झालेल्या नुकसानभरपाईचे अनुदान दिवाळीपूर्वी फक्त ७५ टक्के देण्यात आले होते. उर्वरित २५ टक्के अनुदानाची रक्कम अद्याप वितरित करण्यात आलेली नाही.

Update: 2021-12-23 04:30 GMT

औरंगाबाद // कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाच्या सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकट आल्याचे पाहायला मिळत आहे.सरकारच्या सुलतानी धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अतिवृष्टीमूळे झालेल्या नुकसानभरपाईचे अनुदान दिवाळीपूर्वी फक्त ७५ टक्के देण्यात आले होते. उर्वरित २५ टक्के अनुदानाची रक्कम अद्याप वितरित करण्यात आलेली नाही.

ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एकट्या मराठवाड्यात ४४ लाख ८७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ३६ लाख हेक्टरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारने नुकसानभरपाईची घोषणा केली होती. मात्र, अनुदान वितरित करतांना केवळ ७५ टक्के प्रमाणे अनुदान वाटप करण्यात आले. ३६ लाख हेक्टरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील नुकसान झालेल्या मराठवाड्यात आतापर्यंत २ हजार ८२१ रुपयांचा कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र,

उर्वरित २५ टक्के अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. उर्वरित २५ टक्के अनुदानासाठी मराठवाड्याला ७६३ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबत प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे मात्र, निधी उपलब्ध झाला नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

Tags:    

Similar News