भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

Update: 2021-08-22 12:11 GMT

दिंडोरी तालुक्यातील आदिवासी कोल्हेर येथील शेतकरी तुकाराम चौधरी यांनी दोन एकर मधील घेवडा पीक घेतले होते, परंतु घेवडा पिकाला आता काढणीस सुरुवात केली असता बाजारात भाव नसल्याने पिकच काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

दिंडोरी तालुक्यात दक्षिण पट्ट्यात घेवडा, वांगी, टोमॅटो, भोपळा ही पीक प्रामुख्याने नगदी पीक म्हणून आदिवासी बांधव घेत असतात. यावर्षी भोपळ्याच्या ऐवजी घेवडा पीक आदिवासी शेतकरी तुकाराम चौधरी यांनी लावल्यानंतर त्यांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आहे. घेवडा पीक काढणीस तयार झाले असता बाजारात 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे लागवड खर्च देखील मिळणार नसल्याने चौधरी यांनी पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags:    

Similar News