एका तपानंतरही गोठणेच्या ग्रामस्थांना मातीच्या घरात राहावं लागतंय

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्याच्या एका टोकाला असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वरच्या वरच्या भागात गोठणे गाव होते. व्याघ्र प्रकल्पासाठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारनं संपादित केल्या होत्या. मात्र, अजूनही इथल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं नसल्याचा आरोप केल जातोय.

Update: 2023-09-26 11:46 GMT

व्याघ्र प्रकल्पासाठी गोठणे गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी कवडीमोल भावानं खरेदी करण्यात आल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. या भूसंपादनानंतर गोठणेच्या ग्रामस्थांना घरं आणि जमिनी दोन्ही सोडावं लागलं. त्यानंतर ग्रामस्थांचं पुनर्वसन हे देवरूख इथल्या हातिव ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आलं. मात्र, हातिवमध्ये गोठणेच्या प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. या पीडित प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या व्यथा आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचविल्या आहेत. मात्र, त्यावर कुठलीच कारवाई अद्याप झालेली नाही. राज्य सरकारनं या प्रकल्पग्रस्तांना अजूनही पक्की घरं दिलेली नाही. ६० एकर जागेच्या बदल्यात सरकारनं साडेतीन गुंठा जमीन दिली असून सरकारनं आमची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप प्रकल्पग्रस्तांनी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांच्याशी बोलतांना केलाय.

Full View

Tags:    

Similar News