Twitter Sale : Elon Musk बनले ट्वीटरचे नवे मालक, केली विक्रमी किंमतीत ट्वीटरची खरेदी
गेल्या काही दिवसांपासून एलन मस्क ट्वीटर खरेदी करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र सोमवारी अखेर या चर्चांवर पडदा पडला.
Tesla कंपनीचे CEO एलन मस्क आता आणखी एका कंपनीचे मालक बनले आहेत. तर ती कंपनी आहे ट्वीटर. गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात एलन मस्क हे ट्वीटर खरेदी करणार असल्याची चर्चा होती. तर एलन मस्क यांनी ट्वीटरला विक्रमी किंमतीची ऑफर दिली होती. त्यामुळे त्या ऑफरबाबत सकारात्मक विचार करत ट्वीटरच्या संचालक मंडळाने ट्वीटर ही कंपनी मस्क यांना विकण्याचा निर्णय घेतला.
एलन मस्क यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपण ट्वीटर खरेदी करणार असल्याचे संकेत दिले होते. तर त्यानंतर त्यांनी ट्वीटरला खुली ऑफरही दिली होती. त्यामुळे आता एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर या विक्रमी किंमतीला ट्वीटर खरेदी केली आहे. त्यामुळे एलन मस्क हे आता ट्वीटरचे नवे मालक बनले आहेत.
एलन मस्क यांनी प्रति शेअर 54.50 डॉलर एवढी विक्रमी किंमत देत ट्वीटरचे 100 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. तर यापुर्वी एलन मस्क यांच्याकडे ट्वीटरचे 9 टक्के शेअर्स होते. मात्र आता तब्बल 44 अब्ज डॉलरला ट्वीटर विकत घेतल्याने मस्क हे ट्वीटरचे नवे मालक बनले आहेत.
मस्क यांनी 25 मार्च रोजी एक पोल टाकत ट्वीटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुल्य जोपासते का अशा प्रकारे प्रश्न विचारला होता. त्यावर जगभरातील लाखो लोकांनी प्रतिक्रीया दिल्या होत्या. त्यामुळे एलन मस्क यांनी लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावरही लोकांनी प्रतिक्रीयांचा पाऊस पाडला. त्यानंतर एलन मस्क यांनी केलेल्या ट्वीटमुळे ते ट्वीटर खरेदीसाठी दबाव टाकत असल्याचे दिसून आले.
ट्वीटरच्या खरेदीनंतर मस्क यांची प्रतिक्रीया
ट्वीटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी ट्वीट करून प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सक्रीय लोकशाहीचा आधार आहे. त्यामुळे ट्वीटर हे डिजिटल जगातील एक टाऊन स्क्वेअर असून या व्यासपीठावर मानवतेच्या भविष्याबद्दल चर्चा होते. त्यामुळे मला ट्वीटरला अधिक सक्षम बनवायचे आहे, असे ट्वीट एलन मस्क यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.
मस्क यांनी म्हटले की, ट्वीटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे मी ट्वीटरला बंधमुक्त करण्यासाठी कंपनी आणि युजर्सच्या कम्युनिटीसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे मत एलन मस्क यांनी व्यक्त केले.
याआधी काय घडलं होतं?
एलॉन मस्कने ट्वीटरच्या सध्याच्या शेअर बाजारातील किंमतीपेक्षा 54.20 डॉलर/शेअर इतक्या विक्रमी किंमतीत ट्वीटर खरेदी करण्याची ट्वीट करून ऑफर दिली होती. (Elon Musk offer to Twitter)
मस्कने ऑफर दिल्यानंतर 1 एप्रिल 2022 च्या शेअर बाजारातील दरापेक्षा शेअर्सची किंमत वाढली. मस्कच्या ऑफरनंतर प्रि-ट्रेडिंगमध्ये ट्वीटरच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची वाढ होईल. (Elon Musk's Twitter Bid)
एलॉन मस्कने ट्वीट करून म्हटले होते की, मी ट्वीटर खरेदीसाठी ऑफर देत आहे. तसेच त्यांनी ट्वीटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना पत्र लिहून म्हटले आहे की, मी गुंतवणूक केल्यापासून आतापर्यंत केलेल्या विश्लेषणानुसार कंपनी ही सामाजिक गरज पुर्ण करू शकत नाही. त्यामुळे कंपनीचे खासगीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी दिलेली ऑफर ही सर्वोत्कृष्ट आणि अंतिम ऑफर आहे. त्यामुळे माझी ऑफर स्वीकारली नाही तर मला भागधारक म्हणून विचार करावा लागेल, असे म्हटले होते. (Elon musk offer for Twitter)
एलॉन मस्क हे ट्वीटर या कंपनीचे भागधारक आहेत. त्यांनी यापुर्वी ट्वीट करून म्हटले होते की, ब्लू टीकसाठी लोकांना 3.5 डॉलर प्रति महिना पैसे मोजावे लागू शकतात. तर त्यानंतर एलॉन मस्क यांनी पुन्हा एक ट्वीट करत जगातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींकडून अत्यंत कमी ट्वीट केले जात असल्याचे म्हटले होते. (Popular person twitter use)
एलॉन मस्क ट्वीटरच्या संचालक मंडळात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एलॉन मस्क यांनी संचालक मंडळात सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली. तसेच याबाबत ट्वीटरचे सीईओ (Twitter CEO) पराग अग्रवाल यांनी माहिती दिली. पराग अग्रवाल (Parag Agrawal) म्हणाले, मी यापुर्वीही एलॉन मस्क यांच्याशी संचालक मंडळात सहभागी होण्याविषयी बोललो होतो. त्यांना कंपनीची उपकंपनी म्हणून काम करण्यासाठी संचालक मंडळाची ऑफर दिली होती. मात्र एलॉन मस्कने नकार दिला होता. मात्र अखेर ट्वीटरच्या संचालक मंडळाने एलन मस्क यांची ऑफर स्वीकारली आहे.