काही दिवसांत लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Election 2024) घोषणा होणार असतानाच निवडणूक आयोगात मोठी उलथापालत झालेली पाहायला मिळत आहे. आयुक्त अरुण गोयल ( Arun Goyal ) यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupati murmu ) यांनी गोयल यांचा राजीनामाही स्वीकारला आहे. त्यामुळे गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलेला राजीनामा मोदी सरकारसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. देशाच्या निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन आयुक्त असतात. त्यापैकी एक आयुक्त पद आधीच रिक्त होते. अशातचं आता गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक आयोगाची धुरा केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Rajiv Kumar ) यांच्या खांद्यावर आली आहे.
गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याच्या शर्यतीत
आयुक्त अरुण गोयल यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्वच्छानिवृत्ती घेतली होती. नंतर एका दिवसातच त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ संपायला तीन वर्षे बाकी असतानाच शनिवारी त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याच्या शर्यतीत होते. त्यामुळे आता निवडणूकीच्या तोंडावरच गोयल यांनी दिलेला राजीनामा हा मोदी सरकार साठी मोठा धक्का मानला जात आहे.