नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून एडलवाईज कंपनीची चौकशी

Update: 2023-08-11 07:24 GMT

खालापूर - आज रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशनमध्ये एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्ट ला त्यांच्या एनडी स्टूडीओत आत्महत्या केली. नितीन यांना मानसिक त्रास दिल्या प्रकरणी एडलवाईज कंपनीच्या चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले होते. त्यामुळे आज या कंपनीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे.

४ ऑगस्ट २०२३ रोजी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी लेखी तक्रार दिली होती. 'ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन यांना मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.' असल्याच नितीन यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी सांगितले होते. 

आज खालापूर पोलीस स्टेशन या एडलवाईज कंपनीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशी करिता एडलवाईज कंपनीचे तीन अधिकारी मोठ मोठे डॉक्युमेंट फाईल घेऊन चौकशीला हजर झाले आहेत.

Tags:    

Similar News