मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना ईडीचे समन्स. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये भ्रस्टाचार झाल्याचा सोमय्या यांचा आरोप. १६ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर नुकतेच ईडीने छापे टाकले. आता हसन मुश्रीफ यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqbal Singh Chahal) यांना ईडीने समन्स बजावले आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने जी कोरोना केंद्र (covid center) उभारली होती या कोरोना केंद्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला होता. सोमय्या यांच्या या आरोपानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी कॅगद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
इकबाल चहल यांच्यावर किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रस्टाचार झाली असा आरोप करत आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केले होती. आता सोमय्या यांच्या या आरोपानंतर ईडी सक्तवसुली संचनालयाने (ED - Enforcement Directorate) इकबाल चहल यांना समन्स बजावले आहे. तर त्यांना सोमवार १६ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.