फक्कड हाऊस में ED का स्वागत है, संजय सिंह यांनी लावला बॅनर
गेल्या काही महिन्यांपासून आप खासदार संजय सिंह चर्चेत आहेत. त्यातच आज सकाळीच ईडीचे अधिकारी संजय सिंह यांच्या घरी पोहचले. यासंदर्भात संजय सिंह यांनी माहिती दिली आहे.;
गेल्या काही वर्षांमध्ये ईडीच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच बुधवारी सकाळी सात वाजताच ईडीच्या अधिकाऱ्यांनी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरी छापेमारी केली. यासंदर्भात आपचे खासदार संजय सिंह यांनी माहिती दिली आहे.
आपचे खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीने ही दुसऱ्यांदा छापेमारी केली आहे. याआधीही ईडीने संजय सिंह आणि त्यांचे सहकारी यांच्या घरांवर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. दिल्लीतील मद्य धोरणावरून आप नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना आधीच अटक करण्यात आली आहे. तर आता संजय सिंह यांच्या घरावर ईडीने दुसऱ्यांना छापेमारी केली आहे. मात्र कुठलाही घोटाळा नसताना आमच्या नेत्यांना फसवण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच फक्कड हाऊस में ईडी का स्वागत है, अशा आशयाचा बॅनर संजय सिंह यांनी लावला आहे. हा फोटो आप ने ट्वीट केला आहे.
— AAP (@AamAadmiParty) October 4, 2023
दरम्यान दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. मात्र त्यापुर्वीच संजय सिंह यांच्या घरावर छापेमारी केली आहे. परंतू सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ईडी आणि सीबीआयला नोटीस जारी केल्याची माहितीही आम आदमी पक्षाने दिली आहे.