गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमागे ED चे शुक्लकाष्ट लागल्याचे दिसून येत आहे. त्यातच नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांच्यावर ED ने गुन्हा दाखल केला आहे. (FIR Against Social Worker Medha Patkar)
गेल्या 36 वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (ED Action against Medha patkar) यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ट लागले असून मेधा पाटकर यांच्या संस्थेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताला मेधा पाटकर यांनी लोकसत्ताशी बोलताना अधिकृत दुजोरा दिला.
गाझियाबादचे भाजप जिल्हा सचिव संजीव झा यांनी 2005 साली मेधा पाटकर यांनी मनी लाँडरींगच्या प्रकरणातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. त्याप्रकरणी मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या संस्थेविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (ED file FIR against Medha patkar)
सरदार सरोवराच्या (Sardar sarovar) माध्यमातून निर्माण झालेल्या बुडीत क्षेत्रातील आदिवासींच्या न्याय आणि हक्कासाठी काम करणाऱ्या मेधा पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर यावर मेधा पाटकर यांनी लोकसत्ताशी बोलताना आमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच या कारवाईच्या माध्यमातून आमच्या आंदोलनाला आणि संघर्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
या आरोपामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, 20 लोकांकडून संस्थेला एकच राशी मिळाली. मात्र आमच्या कागदपत्रावरून अशा प्रकारचा कोणताही आरोप सिध्द होत नाही. त्यामुळे राशी मिळाल्याचे आम्हाला मान्य नाही, असे सांगतानाच मेधा पाटकर यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
मेधा पाटकर म्हणाल्या यापुर्वीही आमचे आंदोलन आणि संघर्षाला बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात आणि संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करणाराला मोठा दंड ठोठावत गुन्हा रद्द केला होता. त्याचप्रमाणे हे आणखी एक षडयंत्र असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या.
मेधा पाटकर यांच्या संस्थेला माझगाव डॉक या कंपनीने निधी दिला होता. त्याचाही या प्रकरणाशी संदर्भ जोडण्यात येत आहे. मात्र माझगाव डॉक या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने तात्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून विविध संस्थांना मदत केली होती. त्या संस्थेला सर्व प्रकारचे कागदपत्रे जमा केली होती, असे मेधा पाटकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर त्या कंपनीच्या अहवालात याबाबतची सर्व माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र राजकीय नेत्यांमागे लागलेले ईडीचे शुक्लकाष्ट आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या मागे लागल्याने भाजप राजकीय विरोधकांपाठोपाठ, सामाजिक कार्यकर्त्यांचीही मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. (Medha Patkar denied Alligation)