ED ची दक्षिणेवर स्वारी, शरद पवार यांनी केला निषेध

देशात विरोधी पक्षांविरोधात ईडी, सीबीआयचा वापर केला जात असल्याची टीका केली जात होती. त्यामध्ये उत्तरेकडील राज्यातील नेत्यांचा समावेश होता. मात्र आता महाराष्ट्र, कर्नाटकपाठोपाठ ED ने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.;

Update: 2023-06-14 02:39 GMT

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून केले जातो. त्यातच आता ईडीने (ED) आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला आहे. त्यामध्ये डीएमकेचे मंत्री सेंथील बालाजी (Minister Senthil Balaji) यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली. त्यानंतर सेंथील बालाजी यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यावरून शरद पवार यांनी संताप व्यक्त केला.

शरद पवार यांनी ट्वीट (Sharad pawar Tweet) करून म्हटले आहे की, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने सुरु असलेल्या ईडी कारवाईचा मी निषेध करतो.तामिळनाडूचे मंत्री सेंथील बालाजी यांच्या घरावर छापेमारी करून लोकशाही मधील सरकारविरोधातील आवाज दाबण्यासाठी ईडीने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला आहे. याचा मी निषेध करतो, असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.

सेंथील बालाजी यांना अटक आणि रुग्णालयात दाखल

तामिळनाडूचे उर्जामंत्री सेंथील बालाजी यांच्या घरी ईडीने मंगळवारी छापेमारी केली. त्यानंतर ईडीने सेंथील बालाजी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच त्यांची मेडिकल चाचणी करण्यासाठी मोठ्या सुरक्षेच ओमांदुरार सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र यावेळी सेंथील बालाजी यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Tags:    

Similar News