#ED साठेंचा 'मनसुख हिरेन' होऊ नये:जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची : सोमय्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी अस्थिर करण्याचे प्रयत्न जोराने सुरू झाले असून परिवहन मंत्री अनिल परब यांना टार्गेट केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये अशी मागणी केली आहे.;

Update: 2022-05-31 05:04 GMT

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी अस्थिर करण्याचे प्रयत्न जोराने सुरू झाले असून परिवहन मंत्री अनिल परब यांना टार्गेट केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये अशी मागणी केली आहे.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर काही दिवसांपूर्वी ईडीनं (ED) धाड टाकली. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई झाली आहे

या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परबांवर तोफ डागत हा कथित घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप केलाय. ़आता सोमय्यांनी पुन्हा ट्विटव्दारे थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून रिसॉर्टचे आधीचे मालक विभास साठे (Vibhas Sathe) यांच्या सुरक्षाविषयी काळजी व्यक्त केलीय.

पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Director General of Police Rajnish Seth) यांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटलंय, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची (Dapoli resorts Scam) चौकशी सुरुय. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा/संस्थांनी, तसेच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर (Sai Resort) कारवाई करण्याचा ही निर्णय घेतलाय.

Tags:    

Similar News