खा. कोल्हेंच्या 'त्या' x पोस्टला पोलिसांच प्रत्युत्तर : सरकारी हॅण्डल्स पण भाजपवाले वापरतात का ? युजर्सची टीका
मुंबईमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चौका-चौकात सिग्नल बसवण्यात आले आहेत. परंतू यामध्ये देखील घोळ असल्याचा एक व्हिडीओ करत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का ? असा सवाल या व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
दरम्यान यासंदर्भात अमोल कोल्हे म्हणालेत की "मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे! असं मॅसेज असल्याचं कोल्हेनी सांगितले
कोल्हे म्हणाले की "मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय? असं गणित मांडत सवालही उपस्थित केला आहे. तर वाहतूक शाखेचा उपयोग वसुलीसाठी होतोय का ? याची जनतेला माहिती मिळावी. संबंधित मंत्रीमहोदयांनी, अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करण्याची विंनतीही अमोल कोल्हे यांनी केला आहे.
दरम्यान एका x पोस्ट युजर्सने Mumbai Traffic Police वाहतूक शाखेच्या
वर टीका केली आहे "सगळया सरकारी हॅण्डल्स पण भाजपवाले चालवत आहेत का? एकंदर शेवटचा msg बघता शंका आली आहे तरी शंकेच निरसन करावे..कोण चालवते हे हॅण्डल याची चौकशी कुठे करता येईल असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.