Earthquake : दिल्ली भुकंपाने हादरली
राजधानी दिल्लीत 6.3 रिश्टर स्केलच्या भुकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती.
नेपाळमधील मणिपूर येथे केंद्रबिंदू असलेल्या भुकंपाच्या धक्काने राजधानी दिल्ली चांगलीच हादरली. या भुकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली आणि उत्तराखंड राज्यात धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार 9 नोव्हेंबरच्या रात्री 1.57 मिनिटांनी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे नेपाळमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र देशात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर आले होते. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र गृहमंत्रालय भूकंपाचे धक्के बसलेल्या राज्यांच्या संपर्कात आहे.