BULDHANA | कारागृहातील बंद्यांकरिता ई-मुलाखत सुविधा, ई- मुलाखतीमुळे बंद्याचे नातेवाईक व वकील यांचे वेळ, श्रम व पैशाची बचत होणार | MaxMaharashtra
बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर बंद्याचा बाहेरील जगाशी आणि नातेवाईक यांचेशी संपर्क तुटून जातो. बंद्यांच्या नातेवाईकासोबत संपर्क साधता यावा यासाठी बुलढाणा कारागृहामार्फत नातेवाईक व वकील यांना व्हर्चुअल पद्धतीने घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे आणि ही सुविधा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणार आहे.