पावसाळा सुरु होताच भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. सामान्य नागरिकांना भाजी खरेदी करताना खूप विचार करावा लागत आहे. टोमॅटोचा भाव 100 ते 120 रुपये किलो झाला आहे. तर वांगे, काकडी, कांदे, लसूण, शेंगा हे सगळे किलोला शंभरी पार केली आहे. परिणामी बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी बाजारात आले असताना भाजीपाल्याचे भाव पेट्रोल पेक्षा ही महाग झाल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे आमच्या खिशाला परवडणार नाही. याबद्दल सरकार काहीच करत नाही आहे, यावर सरकारने काहीतरी उपाय योजना केल्या पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची रास्त मागणी आहे.
हे ही पहा