लॉकडाऊन आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे टू व्हिलर विक्रेते संकटात सापडले आहेत. टू व्हिलरच्या वाढत्या किमती आणि दिवसागणिक पेट्रोलच्या वाढत असलेल्या किमतींमुळे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे आणि त्यात लॉकडाऊन लांबल्याने अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. याचा परिणाम प्रत्येक व्यवसायावर झालेला दिसत आहे. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहक टू व्हिलर खरेदी करत असतात. पण पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसागणिक वाढत्या किमतीमुळे टू व्हिलर विक्रेते संकटात सापडले आहेत.