बैल पोळ्याची मिरवणूक काढू नये. बैलांची घरीच पूजा करावी, बैलांचा बाजारालाही बंदी. ऑनलाईन बैल खरेदी करावा प्रशासनाने आदेश.
बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे बैल पोळा. मात्र, या बैल पोळ्याच्या इतिहासात पाहिल्यादाच कोरोनामुळे ग्रहण लागलं आहे. बैलांच्या सजावटी साठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम दिसून आला आहे.
शेती कामासाठी बैल जोडी महत्त्वाची असल्याने ग्रामीण भागात बैल पोळ्याच्या पूर्व संध्येला आणि नंतर मोठ्या प्रमाणावर बैलांचा बाजार भरतो. खरेदी आणि विक्री मोठया प्रमाणावर होते. मात्र, सरकारनं कोरोना संकटामुळे बैल बाजारावर बंदी आणलेली आहे. बैल खरेदी आणि विक्री ऑनलाईन करण्याच्या सल्ला प्रशासनाने दिला आहे.
बैल पूजा घरीच करावी. बैलांची मिरवणूक काढण्यात येवू नये. सार्वजनिक प्रसादाचे वाटप करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही. याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
4 ऑगस्ट 2020 रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या परिपत्रक दिनांक 17 जुलै, 2020 नुसार सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. तरी नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत. याबाबत सूचना देण्यात आल्यात.
मात्र, ऑनलाईन पद्धतीने जनावरांचे बाजार शक्य नसल्याचं शेतकऱ्यांच म्हणणं आहे. एकंदरीतच कोरोनाने शेतकऱ्यांच्या सणाबरोबरच आर्थिक बाबींवर देखील संकट निर्माण केलं आहे..