बुलढाणा:जिल्ह्यातील खामगाव येथे ड्रग्ज ची तस्करी होत असल्याची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर कारवाई करत पोलिसांनी बसस्थानकावरून एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून ड्रग्ज तसेच इतर अमली पदार्थ जप्त केले आहेत. आरोपीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक पंकज जगन्नाथ सपकाळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक परिसरात रात्री ३.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून केलेल्या कारवाईत गुजरात येथील शब्बीर खान उस्मान खान पठाण वय ३५ वर्ष (रा. फुलवाडी निंबायत सुरत,गुजरात) यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी १४०० रुपये, दोन मोबाईल, १० मी.ग्रॅ. च्या १८ नग गोळया ,१.५० ग्रॅम MD ड्रग्ज अंमली पदार्थ, ग्लुकोज असे नमुद असलेला हिरव्या रंगाचा कागदी डबा, ज्यामध्ये प्लास्टीक पन्नीत पांढऱ्या रंगाची पावडर असा २५ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपी विरूद्ध कलम ८ (क), २१ (अ), २२ (अ) एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल केला तर तपासा दरम्यान या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.