डॉ. उल्हास पाटीलसह तिघांची काँग्रेसमधून हकालपट्टी
कॉंग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा उल्हास पाटील आणि देवेंद्र प्रकाश मराठे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.;
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना आसामच्या मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला असल्याने महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे कृत्य सत्तेचा अहंकार व मग्रुरीपणा असल्याची टीका नाना पाटोले यांनी केली.
याच पत्रकार परिषदेत कॉंग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा उल्हास पाटील आणि देवेंद्र प्रकाश मराठे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. उल्हास पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते तर डॉ. देवेंद्र प्रकाश मराठे हे जळगाव ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.