राहुल गांधी यांची पहिली नोकरी व पगार काय होता माहित आहे का?

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी जेवण, लग्न, पहिली नोकरी आणि कुटुंब यावर खुलेपणाने भाष्य केले आहे. नक्की काय म्हंटल आहे त्यांनी वाचा सविस्तर...;

Update: 2023-01-23 10:49 GMT

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी जेवण, लग्न, पहिली नोकरी आणि कुटुंब यावर खुलेपणाने भाष्य केले आहे. राहुल गांधींनी एका मुलाखतीत सांगितले की, मला लग्नाला कोणताही आक्षेप नाही. योग्य मुलगी सापडली की लग्न होईल. त्यांनी आपल्या पहिल्या नोकरी बद्दल देखील सांगितले. ते म्हणाले, 'मी माझी पहिली नोकरी लंडनमध्ये केली....'' यावेळी त्यांना पगार किती होता हे देखील त्यांनी सांगितले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान 'कर्ली टेल्स' या यूट्यूब चॅनलच्या काम्या जानीला त्यांनी ही मुलाखत घेतली आहे. राहुल गांधी यांची ही मुलाखत रविवारी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये त्याने काही मजेशीर किस्सेही सांगितले.

या मुलाखतीत काव्याने राहुल गांधी याना पहिला प्रश्न त्याच्या जेवणाच्या आवडी विषयी विचारला प्रश्न होता, तुम्हाला काय खायला आवडते? या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणतात की, मी सर्व काही खातो. मात्र, मला वाटाणे आवडत नाहीत. जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी काय खातो आणि काय पितो याबद्दल मी खूप कडक असतो. मला येथे कोणताही पर्याय नाही. प्रवासात जे मिळेल ते खातो. तेलंगणातील लोक जेवणात तिखट खूप जास्त खातात. तिथे थोडं कठीण होतं.

उत्तर प्रदेशात स्थलांतरित झालेल्या एका काश्मिरी पंडिताच्या घरात माझा जन्म झाला. पप्पांचे वडील पारशी होते. त्यामुळे सामान्य अन्न घरी शिजवले जाते. दुपारच्या जेवणात देशी पदार्थ असतात तर आणि रात्री कॉन्टिनेंटल फूड तयार केले जाते. आईस्क्रीम माझे आवडते आहे. याशिवाय मला तंदुरी पदार्थ खायला आवडतात. चिकन टिक्का, सीख कबाब आणि ऑम्लेट आवडत असल्याचं राहुल गांधी म्हणाले..

खायला काय आवडतं हा प्रश्न संपल्यानंतर त्यांना लगेच त्यांच्या शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणाविषयी विचारण्यात आले. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. आजीच्या हत्येपूर्वी आम्हाला तेथून बाहेर काढण्यात आले. यानंतर होम स्कूलिंग सुरू झाले, कारण सुरक्षेच्या कारणामुळे आम्हाला शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. मी बरीच वर्षे सेंट स्टीफन कॉलेजमध्ये होतो. तिथे मी इतिहासाचा अभ्यास केला. यानंतर मी हार्वर्ड विद्यापीठात गेलो, जिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण वाचले. त्यानंतर वडील वारले. यानंतर मी अमेरिकेतील रोलिन्स कॉलेजमध्ये गेलो, जिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. मी केंब्रिज विद्यापीठातून मास्टर्स केले आहे.

आता या नंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या पहिल्या नोकरीविषयी सांगितले आहे. खरंतर तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल की, राहुल गांधी यांनी नोकरी केली आहे. इतक्या मोठ्या कुटुंबातून येणार मुलगा ज्याला इतकं मोठं राजकीय पार्शवभूमी आहे. हा मुलगा नोकरी कशाला करेल? असा विचार अनेकांच्या मनातला असेल पण अनेकांना विश्वास बसणार नाही राहुल गांधी यांनी देखील नोकरी केली आहे. याच आपल्या पहिल्या नोकरी विषयी बोलताना ते म्हणतात, मी माझी पहिली नोकरी लंडनमध्ये केली. कंपनीचे नाव 'मॉनिटर' होते, जी एक धोरणात्मक सल्लागार कंपनी होती. त्यावेळी मला मिळणारा पगार त्यावेळच्या मानाने बऱ्यापैकी होता. ते सर्व पैसे घरभाडे आणि इतर गोष्टींवर खर्च झाले. त्या काळात मला 3000 ते 2500 पौंड पगार मिळाला. त्यावेळी मी 25 वर्षांचा होतो.

त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या लग्नाविषयी देखील या मुलाखतीत सांगितले आहे, त्यांचा मुलाखतकाराने प्रश्न केला की, शादी कब करेंगे? यावर ते म्हणतात की, मला योग्य मुलगी मिळाली की मी लग्न करेन. अट एकच आहे की मुलगी प्रेमळ आणि हुशार असावी. -वडिमाझ्या आईलांचे लग्न छान झाले होते. त्यामुळे लग्नाबद्दल माझ्या मनात खूप उच्च विचार आहेत. मी पण असाच जीवनसाथी शोधत असल्याचे ते म्हणाले...

तर अशा प्रकारे राहुल गांधी यांनी त्यांच्या या मुलाखतीत अनेक अराजकीय गोष्टींवर चर्चा केली आहे. अनेक मुद्यांवर त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी अगदी दिलखुलास उत्तरे दिली आहेत..

Tags:    

Similar News