Video: अर्णब गोस्वामीला बालाकोट हल्ल्याची माहिती पंतप्रधानांनीच दिली: राहुल गांधी
रिपब्लिक टीव्ही चे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि BARC चे माजी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यामध्ये व्हाट्स अप वर झालेलं कथीत संभाषण सध्या चर्चेचा विषय आहे. या चर्चेमध्ये देशाच्या सुरक्षिततेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच भाष्य करत अर्णब गोस्वामी यांच्या संभाषणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
काय म्हटलंय राहुल गांधी यांनी... "बालाकोटसारख्या मिशनची माहिती केवळ चार-पाच लोकांकडेच असते. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, एअर चीफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनाच माहिती असते. पण बालाकोटसारख्या मिशनवेळी पायलटलाही शेवटच्या मिनिटाला माहिती दिली जाते. म्हणजे, या पाचपैकी कुणीतरी अर्णब गोस्वामींना माहिती दिली असं म्हणत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षिततेबाबतची माहिती अर्णब गोस्वामीला कोणी दिली? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.
तसंच हे गुन्हेगारी कृत्य आहे आणि ज्यांनी दिले ती व्यक्ती व पत्रकार यांना तुरुंगात जावं लागेल. ही प्रक्रिया सुरू व्हायला हवी. पण ही प्रक्रिया होणार नाही. कारण पंतप्रधानांनीच माहिती दिली असेल. असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.