करुणा शर्मा यांना जामीन मंजूर, काय झालं न्यायालयात?

Update: 2021-09-21 09:04 GMT

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळीत आलेल्या करूणा शर्मा मुंडे यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर आज जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. त्या 16 दिवस न्यायालयीन कोठडीत होत्या. करुणा शर्मा यांनी दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत परळी, आंबाजोगई तालुक्यात यायचं नाही. या अटीवर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज करूणा शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करूणा शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेने त्यांच्यावर जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला असा आरोप केला होता. त्यानंतर करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता.

परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्यायालयाने त्यांना काही अटीवर जामीन मंजूर केला आहे.

Tags:    

Similar News