Dhangar Reservation ; मराठा, ओबीसीनंतर आता धनगर समाज आक्रमक: पडळकरांचे सरकारला पत्र

Update: 2023-09-18 10:04 GMT

मराठा, ओबीसी नंतर आता धनगर समाजही आक्रमक झाला आहे. यावर आता आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात पडळक म्हणाले आहेत की धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत ॲड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे, तसेच न्यायालयात तत्काळ व दैनंदिन सुनावणीकरता सरकारतर्फे अर्ज दाखल करणे, ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधीसुद्धा उपलब्ध झाला नाही. त्याबाबत आढावा घेऊन उपायोजना करणे, मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर ‘स्वतंत्र कायदा‘ आणून त्यांना संरक्षण देणे, आरेवाडीच्या बिरोबा मंदिर देवस्थानाच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविंधासाठी आणि सुशोभिकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणीसाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी शासनाने तत्काळ बैठक लावावी अशी मागणी पडळकर यांनी केली आहे आहे.

Tags:    

Similar News