दामू शिंगडांचे सुपुत्र राज ठाकरेंच्या मनसेत; महाविकास आघाडीला मोठा धक्का

Update: 2024-10-11 07:10 GMT

पालघर : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे. पाच वेळा खासदार राहिलेले दामू शिंगडांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांनी काँग्रेसला रामराम करत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, आणि अनेक इच्छुक उमेदवार तिकीटासाठी विविध पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. महाविकास आघाडीला यामुळे एक मोठा धक्का बसला आहे, कारण सचिन शिंगडांचा मनसेत प्रवेश करण्याचे ठरवले आहे.

सचिन शिंगडा हे पालघर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी काँग्रेसच्या युवक संघटनेत विविध महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. दामू शिंगडा हे काँग्रेसकडून डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिले होते, आणि त्यांचे निधन 2021 मध्ये झाले. आता त्यांच्या मुलाने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.

विक्रमगड भागात शिंगडा कुटुंबाचा मोठा प्रभाव असून, विद्यमान आमदार सुनील भुसारा हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याने महाविकास आघाडीला या जागेवर यश मिळवण्याची शक्यता कमी आहे.

सचिन शिंगडांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या मनसे प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. २०१४ मध्ये त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी ते कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News