ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या १९८५ -८६ साली काढलेल्या 'भारत जोडो' यात्रेला ३८ वर्षे पूर्ण झाली. या यात्रेत सहभागी झाले आंबेजोगाई (बीड ) इथले दगडू लोमटे.वयाच्या २५ व्या वर्षी राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी यात्रेत सहभागी झालेले लोमटे महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक आणि साहित्यिक संघटनांशी स्वतःला जोडून घेत आंबेजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे काम सचिव या नात्याने गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहेत. भारत जोडो यात्रेनंतर देश कसा बदलला. आताची तरुणाई नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत. सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी आज काय करण्याची गरज आहे. सांगताहेत स्वतः दगडू लोमटे मॅक्स महाराष्ट्रच्या मुलाखतीत.त्यांच्याशी संवाद साधला आहे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.