उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर अवघा देश हळहळला. वेग आणि सीटबेल्ट वापरला नसल्याचे उघड झाल्यानंतर सरकारने ताबडतोब सर्व चार चाकी चालकांना सीडबेल्ट बंधरकारक केला आहे. मात्र हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या चारोटी नाक्यानजीक राहणारे प्रगतीशील शेतकरी आणि मॅक्स महाराष्ट्राचे दर्शक व्यंकट अय्यर यांनी नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी त्याच ठिकाणावरुन एक व्हिडिओ शूट करून पाठवलेला आहे. त्यामुळे या अपघातमध्ये दोष कुणाचा असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.