चोपडा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी

चोपडा उपजिल्हा रुग्णालय या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बराच वेळ ताटळत उभे राहावे लागत आहे.;

Update: 2021-08-21 08:32 GMT

कोरोनाचा पादुर्भाव होऊ नये यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे, परंतु अनियमित लसीकरणामुळे नागरिकांना त्यांचे 84 दिवस पूर्ण होऊन देखील लसीकरणासाठी वाट पहावी लागत असल्याचे चित्र चोपडा तालुक्यात पाहायला मिळत आहे.

त्यातच लस उपलब्ध झाल्यानंतर चोपडा उपजिल्हा रुग्णालय या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बराच वेळ ताटळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गर्दी होत असल्याने लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा देखी फज्जा उडल्याचे दिसत आहे. लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News