CPIM नेते सीताराम येचुरी यांचे निधन

Update: 2024-09-12 10:55 GMT

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे CPI (M) महासचिव सीताराम येचुरी ( sitaram yechuri ) यांचे निधन झाले आहे. दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सीताराम येचुरी कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी) चे महासचिव होते. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी चेन्नई येथे झाला होता. २०१६ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सांसद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास सोसला होता. विद्यार्थी काळात जे एन यु छात्र संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. २००५ मध्ये पश्चिम बंगाल मधून राज्यसभा खासदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

Tags:    

Similar News