नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासराळी, गागलेगाव रुद्रापुर, बेळकोणी, कोल्हेबोरगाव, तळणी,डोणगाव,पाचपिपळी, रामपुर,बामणी, चिंचाळा, भोसी, दगडापुर,बामणी यासह पंचक्रोशीतील गावांमध्ये टरबूजाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. या ही वर्षी जवळपास दीडशे एक्कर जमिनीत टरबूज उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे.
मात्र, या वर्षीही करोना महामारीचे संकट व अवकाळी पाऊसामुळे टरबूजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणून व्यापाऱ्यांनी आता टरबूज खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे टरबूज कवडी मोलाच्या भावाने विकले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. कोरोनाच्या या अधिकच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी शासनाने या विषयाकडे लक्ष घालून झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात बिलोली येथील तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
१) टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
२) टरबूज फळ पीक विमा योजनेत समावेश करुन संरक्षण द्यावे.
अशा मागण्या या शेतकऱ्यांनी केल्या आहेत