योगी सरकारच्या आरोग्य सुविधांबाबत माध्यमांना केली तक्रार, गावकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Update: 2021-05-19 05:36 GMT

सौजन्य: वायर

उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्धनगर या जिल्ह्यातील जेवर तालुक्यातील मेवला गोपालगढ गावातील लोकांनी आरोग्य सुविधा नसल्याने निंबाच्या झाडाखाली कोरोना रुग्णांवर उपचार करत असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. या संदर्भात द वायर ने रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने 'द वायर' ला प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना टार्केट केलं आहे. माध्यमांना खोटी प्रतिक्रिया दिली म्हणून यातील काही गावकऱ्यांच्या विरोधात FIR गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्ट अनुसार, गौतमबुद्धनगर प्रशासनाने गावातील 65 वर्षाच्या माजी सरपंचासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या माजी सरपंचाचं नाव हरवीर तलन असून अन्य व्यक्तीचं नाव योगेश तलन असं आहे.

या गावकऱ्यांविरोधात महामारीच्या दरम्यान उत्तर प्रदेशच्या योगी सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची प्रतिमा खराब करण्याच्या हेतूने अफवा पसरवून गाववाल्यांना गुमराह केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

काय म्हटलं होतं माजी सरपंचांने

माजी सरपंच हरवीर तलन ने द वायर ला 19 एप्रिलला प्रतिक्रिया देताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची तक्रार केली होती.

'द वायर' ला दिलेल्या प्रतिक्रियेत माजी सरपंच तलन म्हणाले होते की...

गावात एक असं घर नाही की त्या घरातील व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला आला नसेल. प्रशासन दोन्ही बाबतीत फेल ठरलं आहे. एक लोकांना झालेल्या आजाराची तपासणी करण्यात आणि दुसरे लोकांवर इलाज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यात या दोनही बाबतीत प्रशासन सपशेल अपयशी ठरलं आहे. या गावातील लोक स्वत:ला लाचार समजत आहेत.

रुग्णालय ज्या लोकांना अधिक त्रास होत आहे. अशा लोकांना दाखल करुन घेण्यास नकार देत आहे. ज्या लोकांना अधिक ताप आहे. आणि लक्षण अधिक तीव्र आहेत. अशा लोकांना रुग्णालय भर्ती देखील केलं जात नाही.

असं गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं.

द वायर ने दाखवलेल्या रिपोर्ट मध्ये माजी सरपंच हरवीन तलन बाकी लोकांप्रमाणे निंबाच्या झाडाच्या फांदीला ग्लुकोजची बाटली लटकवून दिवसा झाडाच्या सावलीखाली बसले आहेत.

त्यांच्य़ा मते निंबाच्या झाडामध्ये उपचारात्मक गूण आहेत. या झाडाखाली बाज टाकून झोपलं तर कोरोनाच्या लक्षणांपासून त्यांना आराम मिळेल.

प्रशासनाने गावकऱ्यांचा दावा खोडून काढला आहे. एक स्थानिक अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडिया ला प्रतिक्रिया देताना सांगितलं की,

हरवीर तलन यांनी स्वत:च जाणून बुजून 'झोलाछाप' व्यक्तींच्या सल्ल्याने कोरोना सेंटरवर इलाज घेण्यास नकार दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

गावात कोणाची टेस्ट झाली नाही असा दावा गावकऱ्यांनी केल्या संदर्भात ते सांगतात गावात 13 मे ला दोन मेडिकल कॅंम्प लावण्यात आले होते.

सोमवारी 17 मेला जेवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी ने एक तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सांगितलं आरोपी योगेश तलन च्या विरोधात आईपीसी च्या कलम 188, 269 आणि 270 आणि महामारी रोग अधिनियम च्या कलमानुसार प्राथमिक तक्रार दाखल केली आहे.

Tags:    

Similar News