कंत्राटदाराची कमाल, घडी घालून ठेवता येणारा रस्ता तयार केला

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच आत्ता भर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. चक्क डांबरी रस्त्याने चादरीचे रूप घेतले आहे.;

Update: 2023-05-31 14:33 GMT

जालना जिल्ह्यातील एका गावांमधली डांबरी रस्त्याची व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये चक्क डांबरी रस्त्याची घडी घालताना गावकरी दिसत आहेत. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जालना येथील एका गावामध्ये राणा ठाकूर नामक कॉन्ट्रॅक्टदाराला रस्ता बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते.

भ्रष्टाचार करून रस्ते बांधकामात पैसे उकळण्याचा राणा ठाकूरने चांगलाच प्रयत्न केला आहे. पण त्याचा हा भ्रष्टाचार तेथील गावकऱ्यांनी उघडकीस केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटला शेअर केला आहे. महाराष्ट्र सरकारने 'भ्रष्टाचारी' तंत्रज्ञानामध्ये कमी काळात खूप मोठी प्रगती केली आहे. सत्ता आल्यानंतर तब्बल दहा महिन्यातच जगात पहिल्यांदाच 'फोल्डिंग रस्त्याचा' अविष्कार झाले आहे. असं देखील आव्हाड म्हणाले आहेत.

Tags:    

Similar News