नगरसेवक बनला महापालिका शाळेचा शिक्षक

मिरजमध्ये एक नगरसेवक चक्क शिक्षक बनल्याचा पहायला मिळत आहे. महापालिका शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी एका नगरसेवकाने चक्क शिक्षक बनण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरसेवकाने चक्क ज्ञानदानाचे काम हाती घेतले आहे.;

Update: 2023-02-13 11:09 GMT

नगरसेवक म्हटलं की प्रत्येक वेळी राजकीय व्यक्ती म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक योगेंद्र भगवान थोरात हे मात्र या गोष्टीला अपवाद ठरले आहेत. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी चक्क ज्ञानदानाचे काम हाती घेतले आहे. यासाठी महापालिकेच्या मिरजेतील शाळा क्रमांक १३ मध्ये ते सेवाभावीवृत्तीने शिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे एक नगरसेवक आणि त्याची जबाबदारी ही विकास कामच नव्हे, तर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचीही आहे. हे त्यांनी या माध्यमातून दाखवून दिले आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची मिरज खतीब हॉल या ठिकाणी असणारी ही शाळा क्रमांक १३......महापालिकेच्या या शाळेमध्ये एकूण पाच शिक्षक यामध्ये मुख्याध्यापकासह तीन कायम तर दोन शिक्षण सेवक म्हणून काम पाहतात. या शाळेचा पट आहे. सव्वा दोनशे त्यामुळे या चार शिक्षकांवर या दोनशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा डोलारा आहे. मात्र अपुरी शिक्षक संख्या यामुळे शिक्षणाच्या कामात व्यत्यय येत होता. हीच बाब ओळखत या भागाचे स्थानिक नगरसेवक योगेंद्र भगवान थोरात यांनी पुढाकार घेत मुलांना शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली. यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, म्हणून योगेंद्र थोरात यांनी रीतसर आयुक्तांकडेच विना मोबदला शिकवण्याची परवानगी मागितली. शिक्षक कमी असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी सुद्धा थोरात यांच्या अर्जाला मान्यता देत शिकवण्यास परवानगी दिली. त्यानंतर योगेंद्र थोरात गेल्या आठ दिवसापासून या शाळा क्रमांक १३ मधील आठवीच्या वर्गाला शिकवत आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाबरोबर लोकांच्या समस्या अडचणी समजून घेत आता हे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. त्यामध्ये त्यांना आनंद मिळत आहे.

नगरसेवक योगेंद्र थोरात हे सकाळी साडेआठ वाजता महापालिका शाळेत येतात. साडेदहा वाजेपर्यंत ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना ग्राउंडवर घेऊन जाऊन त्यांच्या सोबत फुटबॉल सुद्धा खेळतात थोरात यांचा हा स्वभाव विद्यार्थ्यांनाही आवडत आहे. आपले शिक्षक असेच असावेत असे शाळा क्रमांक १३ मधील विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे थोरात सरांच्या वर्गावर बसण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते.

सांगली महापालिकेची ही शाळा रेल्वेच्या हद्दीमध्ये आहे. गेल्या अनेक वर्ष नाममात्र भाड्यामध्ये ही शाळा सुरू आहे. आजूबाजूला सर्वसामान्य वस्ती असल्यामुळे या शाळेकडे सामान्य विद्यार्थ्यांचा ओढा मोठा आहे. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे योगेंद्र थोरात यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारापासून ते त्यांच्या कपड्यापर्यंत मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा समाधान आणि चैतन्य आहे. थोरात सरांच्या ज्ञानदानामुळे या शाळेतील शिक्षकांनाही मोठी मदत झालेल्या त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा थोरात सरांचं आभार मानले आहेत.

Tags:    

Similar News