Corona Update : देशात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कायम, मृत्यूसंख्येतही वाढ
देशात नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दररोज वाढतच आहे. तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ झाली आहे.;
देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ही रुग्णवाढ शुक्रवारच्या तुलनेत 4 हजार 631 इतकी आहे. याबरोबरच सध्या देशात 14 लाख 17 हजार 820 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 3.48 टक्के इतके झाले आहे. तसेच देशात 402 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.33 टक्क्यांवर पोहचला आहे.
दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 1 लाख 22 हजार 684 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या कोरोनामुक्तीचा दर 95.20 टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र कोरोना रुग्णवाढीचा दर 16.66 टक्के इतका झाला आहे.
सध्या देशात ओमायक्रॉन (Omiron ) रुग्णसंख्या 6 हजार 41 इतकी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 238 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत राज्याची रुग्णसंख्या 1 हजार 605 इतकी झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 859 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर देशात आतापर्यंत 156 कोटी 2 लाख 51 हजार 117 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर गेल्या 24 तासात देशात 16 लाख 13 हजार 740 कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली.